हृद्यविकाराची संख्या भारतात सर्वात जास्त

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये किंग जॉर्ज चिकित्सा विश्वविद्यालयातील ह्रद्यरोग तज्ञ प्राध्यापक ऋषी सेठी यांनी ह्रद्यविकारावर पहिली मार्गदर्शिका प्रसारीत केली आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की, ह्रद्यविकार होणाऱ्या व्यक्तींचा जगाच्या दृष्टीने विचार केला असता, भारतात सर्वात जास्त लोकांचा मृत्यू ह्रद्यविकाराने होत असतो. यावर उपाय म्हणून तंबाखू खाण्यावर नियंत्रण आणि नियमित व्यायाम करणे महत्त्वाचे आहे असे ते म्हणाले.

Intern Intern | Updated: Apr 20, 2017, 12:23 PM IST
हृद्यविकाराची संख्या भारतात सर्वात जास्त title=

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये किंग जॉर्ज चिकित्सा विश्वविद्यालयातील ह्रद्यरोग तज्ञ प्राध्यापक ऋषी सेठी यांनी ह्रद्यविकारावर पहिली मार्गदर्शिका प्रसारीत केली आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की, ह्रद्यविकार होणाऱ्या व्यक्तींचा जगाच्या दृष्टीने विचार केला असता, भारतात सर्वात जास्त लोकांचा मृत्यू ह्रद्यविकाराने होत असतो. यावर उपाय म्हणून तंबाखू खाण्यावर नियंत्रण आणि नियमित व्यायाम करणे महत्त्वाचे आहे असे ते म्हणाले.

प्रा. ऋषी बोलले की, भारतात २५ टक्के लोकांचा मृत्यू हा ह्रद्यविकाराने होतो. जगातील एक लाख लोकसंख्येमागे २३५ लोकांना ह्रद्यविकाराचा त्रास असतो. परंतू भारतात ही संख्या जास्त आढळते. भारतातील एक लाख लोकसंख्येमागे २७२ लोकांना हा त्रास असतो. म्हणून या विषयावर मार्गदर्शिका असणे महत्त्वाचे आहे.

त्यांचे हे पुस्तक ह्रद्यविकार असलेल्यांना खूप मार्गदर्शक ठरू शकते. त्याचे म्हणणे आहे की, दारु, तंबाखू या व्यसनापासून लांब राहणे आणि ३० मीनीटे व्यायाम हा या रोगावरील उत्तम उपाय आहे.