स्मार्टफोनने लठ्ठपणा वाढतोय का?

आजकाल ज्याच्या हातात स्मार्टफोन असेल तर तो स्मार्ट समजला जातो. परंतु या स्मार्ट बनण्याच्या स्पर्धेत मात्र लोक फारच आळशी होऊ लागलेत आणि याचा परिणाम त्याच्या वजनावर होऊ लागलाय.

Updated: Jul 13, 2013, 01:39 PM IST

www.24taas.com,झी मीडिया,नवी दिल्ली
आजकाल ज्याच्या हातात स्मार्टफोन असेल तर तो स्मार्ट समजला जातो. परंतु या स्मार्ट बनण्याच्या स्पर्धेत मात्र लोक फारच आळशी होऊ लागलेत आणि याचा परिणाम त्याच्या वजनावर होऊ लागलाय. ते गोलगोल लठ्ठ होत आहेत.
स्मार्टफोनमधले वेगवेगळे अॅप्स आणि सोशल नेटवर्किंग साईटमुळे लोक सतत त्या स्मार्टफोनला चिकटून बसलेले असतात. आणि त्यामुळेच त्यांना लठ्ठपणातच्या समस्येला तोंड द्याव लागतयं. इंटरनॅशनल जर्नल ऑफ बिहेवियरल न्यट्रिशिअन अँड फिजिकल एक्टिविटीमध्ये प्रकाशित केलेल्या माहितीनुसार जे लोक स्मार्टफोनतचा वापक अधिक करतात ते आपल्या फिटनेसच्या बाबतीत थोडा निष्काळजीपणा दाखवतात.

केंट स्टेट युनिव्हर्सिटीने केलेल्या संशोधनात असा निष्कर्ष काढला की, टीव्ही, आणि कम्प्यूटर प्रमाणे स्मार्टफोनमुळेही लोक आळशी होऊ लागलेत आणि याचा परिणाम म्हणजे लठ्ठपणा. कॉलेजमध्ये जाणाऱ्या ३०५ विद्यार्थ्यांवर याबाबतीत परीक्षण करण्यात आलं. यात तीन गट करण्यात आले ज्यात ९० मिनिटांपेक्षा कमी वापर करणारे विद्यार्थी, ५ तास स्मार्टफोनचा वापर करणारे विद्यार्थी, आणि १४ तास वापर करणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश केला गेला. स्मार्टफोनवर केले जाणारे सर्फिंग आणि शारिरीक हालचाली यांचे परीक्षण करण्यात आले.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.