उन्हाळ्यात आरोग्याचे सर्वात मोठे हत्यारः दही

दुधापासून तयार होणारे दही हे रुचकर आणि आरोग्यवर्धक माध्यम आहे. दहीमध्ये चांगल्या प्रतीचे बॅक्टेरिया असतात, ते शरीराला लाभदायक असतात.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Apr 28, 2014, 08:37 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
दुधापासून तयार होणारे दही हे रुचकर आणि आरोग्यवर्धक माध्यम आहे. दहीमध्ये चांगल्या प्रतीचे बॅक्टेरिया असतात, ते शरीराला लाभदायक असतात. आयुर्वेदानुसार उन्हाळ्यात दुधापेक्षा दही खाणे अधिक फायद्याचे असते. रोज एक वाटी दही न केवळ आजारांना दूर पळवते तर शरीराचे स्वास्थही चांगले ठेवते. दुधातून मिळणारे फॅट आणि चिकनाई शरीराला एका वयानंतर नुकसान निर्माण करते. पण त्याच दुधाचे दह्यात रुपांतर झाले तर त्यात फॉस्फोरस आणि व्हिटामीन डी शरीराला लाभदायक ठरते.
दहीमध्ये कॅल्शियमला असिडमध्ये रुपात सामाविष्ट करण्याचे गुण आहेत. रोज दूधपेक्षा दही खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. उन्हाळ्यात दहीपासून ताक किंवा लस्सी बनवून प्यायल्यास पोटातील गरमी कमी होते. ताक किंवा लस्सी पिऊन बाहेर पडल्यास उन्हाळी लागण्याचा धोका नसतो.
दुधापेक्षा दही पचण्यास हलके असते. ज्या व्यक्तींनी पोटाचे विकार आहे, जसे अपचन, असिडीटी, गॅस असल्यास दहीपासून केलेल्या लस्सी, मठ्ठा, ताकामुळे उन्हाळ्यात फायदा होतो.
दह्यात हृदय रोग, हाय ब्लड प्रेशरच्या आजार रोखण्याची अद्भूत क्षमता आहे. रक्तातील कॅलेस्ट्रॉल या घातक पदार्थ बनविण्याची प्रक्रिया दही थांबवू शकते. दह्यात कॅल्शियमचे प्रमाण चांगले असल्याने हाडासाठी दही चांगले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.