केस पांढरे होण्यापासून रोखण्यासोबत केसगळतीही थांबवेल हा रस

हल्ली केस पांढरे होणे, केस गळणे ही समस्या साधारण बनलीये. व्यस्त आणि अनियमित लाईफस्टाईलमुळे केस पांढरे होणे, केस गळणे, कोंडा आणि इतर समस्या सतावतात. 

Updated: Sep 9, 2016, 12:25 PM IST
केस पांढरे होण्यापासून रोखण्यासोबत केसगळतीही थांबवेल हा रस title=

मुंबई : हल्ली केस पांढरे होणे, केस गळणे ही समस्या साधारण बनलीये. व्यस्त आणि अनियमित लाईफस्टाईलमुळे केस पांढरे होणे, केस गळणे, कोंडा आणि इतर समस्या सतावतात. 

तसेच मोठ्या प्रमाणात केमिकलयुक्त शाम्पूचा वापर, तसेच सतत हेअर स्ट्रेटनिंग, हेअर ड्रायरचा मोठ्या प्रमाणात वापर यामुळे केसांचे आरोग्य बिघडते. केसांच्या या समस्यांसाठी कांद्याचा हा मास्क उपयोगी ठरतो. हा मास्क नियमितपणे लावल्यास 15-20 दिवसांत फरक जाणवतो. 

हेअर मास्क बनवण्याची कृती

एका कांद्याचे चार तुकडे करुन मिक्सरवर वाटून घ्या. कांद्याचा रसात अर्ध्या लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण केसांना लावून 30 ते 40 मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर शाम्पूने केस स्वच्छ धुवा. आठवड्यातून तीन ते चार वेळा ही कृती करा. 15- 20 दिवसांत तुम्हाला फरक जाणवेल.