केस अधिक गळत असतील तर करा कढी पत्त्याचे हे उपाय!

कढी पत्त्याचा वापर फक्त जेवणात स्वाद वाढविण्यासाठी नाही तर उत्तम आरोग्यासाठीही होतो. कढी पत्त्याला गोडलिंबही म्हणतात. या पानांमध्ये अनेक औषधी गुण आहेत. कढीपत्ते केसांना काळं करण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्याच्या नियमित वापरानं आपल्या केसांमध्ये जीव येतो आणि ते काळे होऊ लागतात. केसांसाठी कढीपत्त्याचे आणखी फायदे आहेत. ते पाहून घेऊया...

Updated: Feb 12, 2016, 11:00 PM IST
केस अधिक गळत असतील तर करा कढी पत्त्याचे हे उपाय! title=

मुंबई : कढी पत्त्याचा वापर फक्त जेवणात स्वाद वाढविण्यासाठी नाही तर उत्तम आरोग्यासाठीही होतो. कढी पत्त्याला गोडलिंबही म्हणतात. या पानांमध्ये अनेक औषधी गुण आहेत. कढीपत्ते केसांना काळं करण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्याच्या नियमित वापरानं आपल्या केसांमध्ये जीव येतो आणि ते काळे होऊ लागतात. केसांसाठी कढीपत्त्याचे आणखी फायदे आहेत. ते पाहून घेऊया...

केसांसाठी म्हणून उपयुक्त आहे कढीपत्ता

गरजेपेक्षा जास्त केमिकलचा वापर आणि प्रदूषणामुळे केसांचं नुकसान होतं. कढीपत्त्यात असे सर्व पोषक तत्त्वे आहेत, जे केसांना निरोगी ठेवतात. या पानांना बारीक करून त्याचा लेप बनवावा. मग तो लेप केसांच्या मुळाशी लावावा. आपण कढीपत्ता खावू शकतो, यामुळे केस काळे, लांब आणि घनदाट होतात. सोबतच केसांची मूळं मजबूत होतात. कढीपत्त्यात व्हिटॅमिन बी१, बी३, बी९ आणि सी असतात. याशिवाय आयरन, कॅल्शियम आणि फॉस्फोरस आढळतं. याचं दररोज सेवन केल्यानं आपले केस काळे, लांबसडक होतील. तसंच डँड्रफ म्हणजेच कोंड्याची समस्याही दूर होईल.

आणखी वाचा - केसगळतीवर हीना-मोहरी तेलाचं मिश्रण रामबाण उपाय

कसा कराल कढी पत्त्याचा वापर

कढी पत्ता वाळवून घ्यावा. वाळल्यानंतर पानांचं पावडर तयार करून घ्यावं. आता २०० मिमी खोबरेल तेलात किंवा ऑलिव्ह ऑईलमध्ये जवळपास ४ ते ५ चमचे कढीपत्त्याचं पावडर मिक्स करून उकळून घ्यावं. चांगल्या उकळीनंतर ते थंड होऊ द्यावं. मग तेल गाळून एका हवाबंद बॉटलमध्ये टाकावं. झोपण्यापूर्वी दररोज हे तेल लावावं. जर तेल थोडं कोमट करून लावलं तर अधिक फायदेशीर ठरतं. दुसऱ्या दिवशी नैसर्गित शॅम्पूनं केस धुवावेत. चांगला फायदा होईल.

केसांसाठी तयार करावा मास्क

कढीपत्त्याची पानं बारीक करून पेस्ट बनवा. त्यात थोडं दही घालून केसांना लावा. आता केस २०-२५ मिनीटं तसेच ठेवा, नंतर शॅम्पूनं केस धुवा. असं नेहमी केल्यानं केस काळे आणि घनदाट होतात.

आणखी वाचा - रोजच्या काही सवयी... ज्यामुळे आपणच बनतोय आपल्या केसांचे शत्रू!

कढीपत्त्याचा चहा तयार करा

कढी पत्ता पाण्यात उकळून घ्या. यात लिंबू पिळा आणि साखर घाला. असा चहा बनवून एक आठवडा प्यावा. हा चहा आपल्या केसांना लांब, घनदाट बनवेल. सोबतच केस पांढरे होण्यापासून वाचवेल आणि आपली डायडेस्टिव सिस्टमही स्वस्थ ठेवेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.