दहशतवादी हल्लात महाराष्ट्राचे २ जवान शहीद

जम्मूजवळ नागरोटा येथे लष्कराच्या एका तुकडीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचे २ जवान शहीद झाले आहेत. नांदेडचे  संभाजी कदम तर पंढरपूरचे कर्नल कुणाल गोसावी यांना वीरमरण आलं.

Updated: Nov 29, 2016, 05:07 PM IST
दहशतवादी हल्लात महाराष्ट्राचे २ जवान शहीद title=

नागरोटा : जम्मूजवळ नागरोटा येथे लष्कराच्या एका तुकडीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचे २ जवान शहीद झाले आहेत. नांदेडचे  संभाजी कदम तर पंढरपूरचे कर्नल कुणाल गोसावी यांना वीरमरण आलं.

संभाजी यशवंत कदम मराठा लाईट इन्फंट्रीचे जवान होते. जम्मूमध्ये नगरोटामध्ये लष्कराच्या 166 व्या मीडियम आर्टीलरी रेजीमेंटवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. सध्या क्षेत्रात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये २ वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले.