यंदाच्या उन्हाळ्यात तुम्हाला जोरदार घाम फुटणार

मुंबई : ही बातमी वाचून तुम्हाला घाम फुटेल. कारण, भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदाचा उन्हाळा आणखी तापदायक असणार आहे. याचा सर्वात जास्त फटका मध्य भारत आणि वायव्येकडील प्रांतांना बसणार आहे

Updated: Apr 1, 2016, 12:54 PM IST
यंदाच्या उन्हाळ्यात तुम्हाला जोरदार घाम फुटणार  title=

मुंबई : ही बातमी वाचून तुम्हाला घाम फुटेल. कारण, भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदाचा उन्हाळा आणखी तापदायक असणार आहे. याचा सर्वात जास्त फटका मध्य भारत आणि वायव्येकडील प्रांतांना बसणार आहे.

येत्या काही दिवसांत देशाच्या सगळ्याच भागांत उन्हाची तीव्रता आणखी वाढणार आहे. हवामान विभागानं ही माहिती दिलीय. जूनपर्यंत असाच उकाडा राहणार आहे. पुढच्या काही दिवसांत सरासरीपेक्षा तापमान जास्त राहणार आहे. सामान्य तापमानापेक्षा १ अंश सेल्सिअसने तापमान जास्त राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

मध्य भारताप्रमाणे महाराष्ट्रातील, मराठवाडा, विदर्भ आणि मराठवाड्याला या हवामानबदलाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

उन्हाळ्याबाबत हवामान विभागानं पहिल्यांदाच असा अंदाज वर्तवलाय. आता दर पंधरा दिवसांनी उन्हाळ्यासंदर्भात ऍलर्ट जारी करण्यात येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे प्रदूषणात झालेली वाढ हे उष्णतेची लाट वाढण्याचं प्रमुख कारण आहे.