नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाचे वातावरण असताना कारगिल युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानाच्या मुलीने दोन्ही देशांना संदेश देणारा व्हिडीओ अपलोड केलाय.
१९९९मध्ये झालेल्या युद्धात तिचे वडील शहीद झाले. हे युद्ध झालं नसतं तर कदाचित माझे बाबा माझ्याजवळ असते. मी अशी एकटीच नाहीये. तर असे माझ्यासारखे अनेक जण आहेत. जर दोन वर्ल्डवॉरनंतर फ्रान्स आणि जर्मनी एकत्र येऊ शकतात. जपान आणि अमेरिका त्यांचा भूतकाळ विसरून प्रगतीसाठी एकत्र येऊ शकतात. तर आपण का नाही असा सवाल तिने यावेळी उपस्थित केलाय.
लोकांना युद्ध नकोय तर शांतता हवी आहे. दोन्ही देशांतील अधिकतर लोकांना शांती हवीये असा मेसेज तिने या व्हिडीओतून दिलाय.
पाहा हा व्हिडीओ