नवी दिल्ली : सर्वांसाठी महत्वाची ही बातमी आहे, कारण यापुढं इन्कम टॅक्स रिटर्न भरायचा असेल किंवा पॅन कार्डसाठी अर्ज करायचा असेल तर आधार कार्ड बंधनकारक असणार आहे. येत्या १ जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होईल, असं केंद्र सरकारनं मंगळवारी स्पष्ट केलं.
केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी यंदाच्या अर्थसंकल्पीय भाषणात याबाबतचं सूतोवाच केलं होतं. सध्या संसदेत वित्त विधेयकावर चर्चा सुरू असून, त्यात ही सुधारणा सुचवण्यात आली आहे.
एखाद्याचं आधार कार्ड मिळालेले नसल्यास आधार कार्डासाठी अर्ज केल्याचा क्रमांकही आयकर रिटर्न भरताना सोबत जोडता येईल, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे.