'आप'मध्ये कुमार विश्वास, शाजिया इल्मींचे बंडाचे झेंडे?

लोकसभा निवडणुकीवरून आम आदमी पार्टीत तिकीट वाटपावरून बंडाचे झेंडे फडकण्याची दाट शक्यता आहे.

Updated: Mar 12, 2014, 03:49 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीवरून आम आदमी पार्टीत तिकीट वाटपावरून बंडाचे झेंडे फडकण्याची दाट शक्यता आहे.
भारतीय राजकारणातली ही भयानक गारपीट म्हणावी लागेल. कारण अरविंद केजरीवाल यांचे खंदे समर्थक, कुमार विश्वास आणि शाजिया इल्मी बंडखोरीच्या दिशेने वक्तव्य करत असतांना दिसतंय.
तिकीट वाटपावरून शाजिया इल्मी आणि कुमार विश्वास यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तिकीट वाटपावरून या आपच्या दोन सरदारांमध्ये बंडाचं वारं शिरलं असल्याचं दिसून येतंय.
कुमार विश्वासने आपल्या अनोख्या अंदाजात कविता लिहून ट्वीट केलंय, `चढ़ती नदी में नाले गिरेंगे तो आस्थावान स्नान से भी डरेगा, आचमन तो भूल ही जाओ`.
काही लोकांना आपकडून तिकीट देण्यावर कुमार विश्वास हे नाराज आहेत. कुमार विश्वास हे अमेठी मतदारसंघातून राहुल गांधी यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहेत.
सोमवारी देशभरातील टीव्ही चॅनेल्सवर कुमार विश्वासची नाराजीची बातमी आल्यानंतर, आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी कुमार विश्वास यांना सरळ शब्दात उत्तर दिलं
केजरीवाल यांनी म्हटलं आहे, नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्यानंतर काही संबंध नव्याने समोर येत आहेत. असा तर्क लावला जातोय, की अरविंद केजरीवाल यांचा इशारा कुमार विश्वास यांच्याकडे आहे.
कारण एका कवि संमेलनादरम्यान कुमार विश्वास यांनी नरेंद्र मोदींची चांगलीच वाह वा केली होती.
दुसरीकडे आपच्या नेत्.या शाजिया इल्मी यांनी सर्व शक्यतांना पूर्णविराम लावत, आपण बरेलीमधून निवडणूक लढवणार नसल्याचं म्हटलं आहे.
शाजियाने ट्वीट केलं आहे की, आपण रायबरेलीतून निवडणूक लढवण्यावर कधीही सहमत नव्हतो, मागील दोन महिन्यांपासून आपण याला नकार देत आलो आहोत.
या आधी शाजिया इल्मी रायबरेली लोकसभेतून लढणार असल्याचं म्हटलं जात होतं. दिल्ली विधानसभा निवडणुकीत शाजिया इल्मी आर के पुरम सीटवरून फार थोड्या मतांनी पराभूत झाल्या होत्या.
याशिवाय प्रसिद्ध नृत्यांगणा आणि आपच्या सदस्या मल्लिका साराभआई यांनी सुद्धा निवडणूक लढवण्यास नकार दिलाय.
पक्षानं दुर्लक्ष केल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाल्यानं साराभाई यांनी हा निर्णय घेतल्याचं समजतंय. 2009 च्या निवडणूकीत मल्लिका साराभाई यांना लालकृष्ण अडवाणींकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.