नवी दिल्ली : आपचे नेते कुमार विश्वास यांनी भाजपने त्यांच्यावर केलेले आरोप फेटाळले आहेत. 'भारतीय जनता पक्षाने माझ्यावर केलेले आरोप सिद्ध झाल्यास मी राजकारणात संन्यास घेईन' असं कुमार विश्वास यांनी म्हटलं आहे.
कुमार विश्वास यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्यावर अश्लिल टिप्पणी केली असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. विश्वास यांच्याविरुद्ध निवडणूक आयोगाकडे ही तक्रार करण्यात आली आहे.
'मी किरण बेदी यांचा आदर करतो'- विश्वास
आपल्यावरील आरोपांचं स्पष्टीकरण देतांना कुमार विश्वास म्हणाले, 'मी किरण बेदी यांचा आदर करतो. मी त्यांना किरण दीदी असे संबोधतो, त्यामुळे मी अशी टिप्पणी कशी करेल? माझ्यावरील आरोप सिद्ध झाल्यास मी राजकारणात संन्यास घेईल.
भाजपला दिल्लीवर आधारित मुद्दे नसल्याने ते अशी काहीही मार्ग अवलंबित आहेत' याप्रकरणी आम आदमी पक्षाचे शिष्टमंडळही याप्रकरणी निवडणूक आयोगाची आज दुपारी भेट घेणार आहे.
निर्मला सीतारमण यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. हा आचारसंहितेचा भंग असल्याचे म्हणत आयोगाने या तक्रारीसह यापूर्वीही करण्यात आलेल्या तक्रारींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
'अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत कुमार विश्वास यांनी बदनामीकारक टिप्पणी केली आहे. आम्ही कुमार विश्वास आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर कारवाई करण्यास सांगितले आहे. त्यांच्याविरुद्ध लवकरच कारवाई करण्यात येईल.
भाजपच्या वतीने महिला उमेदवार असून ही अशी टिपणी ही अत्यंत बदनामीची असल्याचे भाजपच्या नेत्या शाझिया इल्मी यांनी म्हटले आहे.
दरम्यान कुमार विश्वास यांनी नुकत्याच एका मेळाव्यात बोलताना अत्यंत अश्लिल टिप्पणी केली आहे, विश्वास यांच्याविरुद्ध आपण पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे, असे किरण बेदी यांनी ट्विटरद्वारे स्पष्ट केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.