बिहार : एक तरुणी झोपली असताना तिच्या तोंडावर एका अज्ञात इसमानं अॅसिड टाकल्याची धक्कादायक घटना बिहारमध्ये घडलीय.
बिहारच्या खागडयी जिल्ह्यातील गोगरी ठाणे क्षेत्रात मंगळवारी रात्री उशीरा ही घटना घडलीय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुश्कीपूर गावात राहणारी पूनम कुमारी ही १८ वर्षांची युवती आपल्या घरी झोपली होती. तिच्या बाजुलाच तिच्या दोन बहिणीही झोपलेल्या होत्या.
झोपेतच तिच्या तोंडावर काही अज्ञात व्यक्तींनी खिडकीतून अॅसिडची बाटली आतमध्ये फेकली.
यामुळे, पूनमसोबतच तिच्या दोन बहिणी रुबी आणि बेबी यादेखील यांनादेखील गंभीर इजा झालीय. या घटनेत पूनमचे दोन्ही हात अॅसिडमुळे भाजलेत.
घटनेनंतर तात्काळ या तिन्ही बहिणींना जवळच्या हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलं.
शेजाऱ्यांसोबत सुरू असलेल्या जमिनीच्या वादातून हल्ला झाल्याचा तरुणीच्या कुटुंबाचं म्हणणं आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.