www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख राहुल गांधींनी आक्रमक भाषण करत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी राहुल गांधींनी अनेक लोकप्रिय घोषणा केल्या. मात्र ज्या बहुप्रतिक्षित घोषणेची सर्वांना उत्सुकता होती त्या पीएपदाच्या उमेदवारीवर त्यांनी अखेर भूमिका स्पष्ट केली. काँग्रेस पक्ष हा लोकशाही तत्वावर चालणारा पक्ष आहे. त्यामुळं राज्य घटनेनुसार पंतप्रधानाची निवड खासदारच करतील असं सांगत पंतप्रधानपदाच्या उमेदवारीच्या चर्चेला विराम देण्याचा प्रयत्न केला.
राहुल गांधी काय बोलले
* पक्ष देणार ती जबाबदारी घेणार - राहुल गांधी
* पंतप्रधानाची निवड खासदार करतात... असं राज्यघटनेत लिहिलंय
* काँग्रेस पक्ष राज्यघटना मानतो - राहुल
* विरोधक केवळ मार्केटींग चांगल्या पद्धतीनं करत आहेत - राहुल
* विरोधक केस नसलेल्यांना कंगवा विकत आहेत - राहुल
* १५ जागांवरचे उमेदवार लोक ठरवणात
* पंतप्रधानजी, वर्षात १२ अनुदानिक सिलेंडर हवेत... नऊ सिलेंडर पुरत नाहीत - राहुल
* येत्या ५ वर्षांत गरिबांना मध्यमवर्गात आणू
* ५० टक्के काँग्रेसशासित राज्यांत महिला मुख्यमंत्री
* कार्यकर्त्यांच्या बळावरच निवडणूक लढवणार - राहुल
* अनेक दिवसांनंतर पहिल्यांदाच राहुल गांधींचं आक्रमक भाषण
* राहुल गांधींचं जोशपूर्ण भाषण
* अन्न सुरक्षा कायदा काँग्रेसनंच आणला - राहुल
* कार्यकर्त्यांचे मत विचारात घेणार - राहुल
* प्रामाणिक लोकांचा सन्मान करू - राहुल
* ज्यांच्या हृदयात काँग्रेस त्यांनाच तिकीट - राहुल
* भ्रष्ट लोकांना शिक्षा होणारच - राहुल
* काँग्रेसच अपेक्षित बदल घडवू शकतो - राहुल
* देशहिताविरोधात आम्ही वागलो नाही - राहुल
* नरेगाचं श्रेयही काँग्रेसलाच - राहुल
* लोकपालचं श्रेय काँग्रेसलाच - राहुल
* संसदेत गदारोळ करणाऱ्या विरोधकांवर टीका
* लोकपाल काँग्रेस पक्षानंच पास केला- राहुल गांधी
* कायद्याच्या प्रकियेत जनतेचा सहभाग हवा
* गेल्या १० वर्षांतली काँग्रेसची कामगिरी चांगली
* लोकशाही म्हणजे एका व्यक्तीचं राज्य नव्हे - राहुल
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.