ऑल इंडिया प्री मेडिकल टेस्ट 2015 सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगित

सर्वोच्च न्यायालयाने ऑल इंडिया प्री मेडिकल टेस्ट 2015 (एआयपीएमटी) आज रद्द केली असून ती पुन्हा चार आठवड्यात घेण्याचे आदेश दिलेत. सुमारे 6.30 लाख विद्यार्थ्यांना आता ही परिक्षा पुन्हा द्यावी लागणार आहे.

Updated: Jun 15, 2015, 01:59 PM IST
ऑल इंडिया प्री मेडिकल टेस्ट 2015 सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगित title=

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने ऑल इंडिया प्री मेडिकल टेस्ट 2015 (एआयपीएमटी) आज रद्द केली असून ती पुन्हा चार आठवड्यात घेण्याचे आदेश दिलेत. सुमारे 6.30 लाख विद्यार्थ्यांना आता ही परिक्षा पुन्हा द्यावी लागणार आहे.

तीन मे रोजी घेण्यात आलेल्या या परिक्षेत मोठ्या प्रमाणावर अनियमितचे आरोप झाल्यानंतर त्यासंबंधीच्या याचिकावरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने 12 जूनला राखून ठेवला होता. 

न्यायमूर्ती आर. के. अग्रवाल आणि न्यायमूर्ती अमिताभ राय यांच्या खंडपीठाने ही परिक्षा पुन्हा घेईपर्यंत एआयपीएमटीचे निकाल जाहीर न करण्याचे आदेश केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाला दिलेत.

जर एकही विद्यार्थी गैरमार्गाने यश मिळाले तर परिक्षेची गुणवत्ता खराब होते. मागील काही घटनांवरून हा निर्णय घ्यावा लागत आहे. यात सीबीएससीचा दोष नसला तरीही होणाऱ्या गोष्टी लक्षात घेऊन ठोस पावले उचलणे आवश्यक होते. सीबीएससीची बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल रंजीत कुमार यांनी परिक्षा रद्द करण्याच्या पर्यायाला विरोध करत 44 दोषी विद्यार्थ्यांसाठी 6.30 लाख विद्यार्थ्यांना वेठीस धरणे योग्य नसल्याचे सुनावणीदरम्यान सांगितलं होतं.

8 जूनला एआयपीएमटीचा निकाल 12 तारीखपर्यंत जाहीर न करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे 5 जूनला जाहीर होणारे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. आता ही परिक्षाच रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांना परिक्षेला तोंड द्यावं लागणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.