एअर इंडियाच्या 'त्या' ४०० सुंदऱ्या परतल्याच नाहीत!

एका विमान कंपनीच्या हवाई सुंदऱ्या झाल्यात फरार.एक, दोन नव्हे तर चक्क ४०० हवाई सुंदऱ्या झाल्यात फरार. एअर इंडियामधील हवाई सुंदऱ्या दोन वर्षांची रजा घेऊन गेल्या खऱ्या मात्र त्या पुन्हा कामावर आल्याच नाहीत

Updated: Jul 22, 2013, 02:33 PM IST

www.24taas.com,झी मीडिया,मुंबई
'एअर इंडिया'च्या हवाई सुंदऱ्या फरार झाल्यात... एक, दोन नव्हे तर चक्क ४०० हवाई सुंदऱ्या फरार झाल्यात. धक्का बसला ना! पण, ही माहिती एअर इंडिया प्रशानसनानंच दिलीय.
एअर इंडियामधील दोन वर्षांची बिनपगारी रजा घेऊन गेलेल्या जवळपास ४०० हवाई सुंदऱ्या अद्यापही कामावर परतलेल्या नाहीत. त्या सध्या कुठे आहेत, काय करत आहेत, याचाही तपशील एअर इंडियाकडे नाही. त्यामुळे कंपनीनं त्यांना फरार म्हणून घोषित केलं गेलंय.
एअर इंडियामध्ये एकूण ३,६०० चालक दल सदस्य कर्मचारी आहेत. त्यातील ४०० जणींनी रजेच्या नावावर नोकरीला बाय बाय केल्याचं आकडेवारीवरून समजतं. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना दोन वर्षाची बिनपगारी रजा घेता येते. याचाच फायदा घेऊन या हवाई सुंदऱ्य़ांनी नोकरीला बाय-बाय म्हटल्याचं दिसतंय. कंपनीने त्यांना फरार घोषित केलंय. आता त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात येणार आहे. ४०० हवाई सुंदऱ्यांपैकी ३०० जणी दिल्लीच्या आहेत. टप्प्याटप्प्याने त्यांना नोकरीवरुन काढण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ४४ जणींना काढून टाकण्यात येणार आहे.

एअर इंडिया जेव्हा संकटात होती तेव्हा या हवाई सुंदऱ्यांनी या नोकऱ्या नोकऱ्या सोडल्या असाव्यात. संकटाच्या काळात एअर इंडियात वेतन वेळेवर होत नव्हते. त्या काळात या महिलांनी नोकऱ्या सोडून दुसरीकडे नोकऱ्या धरल्या असाव्यात; पण नवी नोकरी स्वीकारताना त्यांनी आधीच्या नोकरीचा राजीनामा द्यायला हवा होता. परंतु, त्यांनी असे केलेले दिसत नाही. त्यांच्या विषयी कोणतीही माहिती कंपनीकडे उपलब्ध नाही.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.