मुंबई : राज्यसभेसाठी भाजपकडून कुणाला उमेदवारी द्यायची यावर भाजपने शेवटच्या क्षणी आपला निर्णय बदलला आहे. गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक अमर साबळे यांना उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे.
विनय सहस्त्रबुद्धे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याचं सुरूवातीला सांगण्यात येत होतं, मात्र शेवटच्या क्षणी पिंपरी-चिंचवडमधील भाजपचे दलित नेते अमर साबळे यांचं नाव पुढे आलं.
अमर साबळे यांनी यावर समाधान व्यक्त केलं आहे, भाजपमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यालाही न्याय मिळतो हे यावरून सिद्ध होत असल्याचं त्यांनी म्हटलंय, मी २० वर्ष पत्रकारिता केली, हा पत्रकारांचा सन्मान असल्याचंही साबळे यांनी म्हटलंय
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.