नवी दिल्ली: आयपीएस अनिल कुमार सिन्हा यांची सीबीआयच्या संचालकपदावर नेमणूक करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्य न्यायधीश एच.एल. दत्तू आणि विरोधीपक्ष नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी सिन्हा यांची संचालक पदावर नेमणूक केली आहे.
याकरता ४० अधिकाऱ्यांच्या यादीतून सिन्हा यांची निवड करण्यात आली आहे. माजी सीबीआय संचालक रणजीत सिन्हा यांच्यावर २जी स्पेक्ट्रम प्रकरणी सुप्रिम कोर्टानं ताशेरे ओढले होते. त्यामुळं रणजीत सिन्हा यांची काराकीर्द वादग्रस्त ठरलीच पण सीबीआयच्या नि:पक्षपातीपणावरही शंका उपस्थित केली जाऊ लागल्यानं रणजीत सिन्हा यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. त्यामुळं संचालक पद कुणाकडे सोपवले जाईल याबाबत देशभरात उत्सुकता होती.
अनिल कुमार सिन्हा यांची १९७९ साली बिहारमध्ये आयपीएस म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तसंच त्यांना राष्ट्रपती पदकानंही गौरवण्यात आलं आहे. सीबीआयच्या संचालकपदी नेमणूक होण्यापूर्वी २०१३ साली ते केंद्रीय दक्षता आयोग (CVC) मध्ये कार्यरत होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.