नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर आणि झारखंडमधील दुसऱ्या टप्प्यातील मतदान शांततेत पार पडले. जम्मू-काश्मीरमध्ये ७१ टक्के तर झारखंडमध्ये ६५ टक्के एवढ्या विक्रमी मतदानाची नोंद झाली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये दुसऱ्या टप्प्यात १८ मतदारसंघांत मतदान झाले. येथून १७५ उमेदवार रिंगणात होते. यात चार विद्यमान मंत्र्यांचा समावेश आहे. तर झारखंडमध्ये २० मतदारसंघांतून २२३ उमेदवार निवडणूक मैदानात आहेत.
झारखंडमध्ये जमशेदपूर (पूर्व) आणि जमशेदपूर (पश्चिम) येथे अनेक ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाली होती, पण या किरकोळ तांत्रिक समस्या वगळल्या, तर उर्वरित मतदान शांततेत पार पडले. झारखंडचे माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रघुबर दास, ज्येष्ठ भाजप नेत्या शरयू राय, झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते चाम्पई सोरेन आदी नेत्यांनी आता कसोटी लागणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.