एनडीए म्हणजे काँग्रेस+गाय, भाजप नेते अरूण शौरींचं टीकास्त्र

माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरींनी मोदी सरकारवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्लाबोल केलाय.  सध्याचं पंतप्रधानांचं कार्यालय हे आतापर्यंतचं सर्वात कमजोर पंतप्रधान कार्यालय असून यातील कोणतीही व्यक्ती निपूण नसल्याचं शौरी म्हणालेत.

Updated: Oct 27, 2015, 04:22 PM IST
एनडीए म्हणजे काँग्रेस+गाय, भाजप नेते अरूण शौरींचं टीकास्त्र

नवी दिल्ली: माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरींनी मोदी सरकारवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्लाबोल केलाय.  सध्याचं पंतप्रधानांचं कार्यालय हे आतापर्यंतचं सर्वात कमजोर पंतप्रधान कार्यालय असून यातील कोणतीही व्यक्ती निपूण नसल्याचं शौरी म्हणालेत.

सध्याचं एनडीए सरकार हे दिशाहीन असून केवळ चर्चेत राहण्यासाठी वाट्टेल ते करण्याचा मोदींचा अट्टहास असल्याचं शौरींनी म्हटलंय. मात्र अर्थव्यवस्था सुधारण्यात सपशेल अपयशी असल्याचा आरोप शौरींनी केलाय. NDA सरकार म्हणजे काँग्रेस अधिक गाय असं ते म्हणालात. 

या सरकारची धोरणं तयार करण्याची पद्धत ही काँग्रेससारखीच आहे, त्यात वेगळं काहीही होत नाही केवळ गायीसारखे काही मुद्दे वेगळे असल्याचं त्यांनी म्हटलंय. एका पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात शौरी बोलत होते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.