'दिल्लीची जबाबदारी आमच्यावर सोपवा, तुम्ही देश सांभाळा'

पूर्ण बहुमतानं आता दिल्लीत आम आदमीचं सरकार स्थापन होतंय... दिल्लीचे लोक खूप प्रेम करतात हे माहीत होतं... पण, ७० पैंकी ६७ जागा...

Updated: Feb 14, 2015, 01:29 PM IST
'दिल्लीची जबाबदारी आमच्यावर सोपवा, तुम्ही देश सांभाळा' title=

नवी दिल्ली : दिल्लीचे आठवे मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी शपथ घेतलीय. शपथ विधीनंतर स्टेजवरून त्यांनी कार्येकर्त्यांशी संवाद साधला... यावेळी, दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळण्यासाठी आपले प्रयत्न सुरुच आहेत... याबद्दल आपण पंतप्रधानांना भेटून त्यांच्यापर्यंत आपलं म्हणणं पोहचवलंय, असंही केजरीवाल यांनी म्हटलंय.

पाहुयात... यावेळी त्यांनी काय काय म्हटलंय
- पूर्ण बहुमतानं आता दिल्लीत आम आदमीचं सरकार स्थापन होतंय
- दिल्लीचे लोक खूप प्रेम करतात हे माहीत होतं... पण, ७० पैंकी ६७ जागा... (भावूक क्षण) 
- हिंदू, मुस्लिम, मुस्लिम, ख्रिश्चन... प्रत्येक धर्माच्या लोकांनी मतं दिली
-  ७० पैंकी ६७ जागा... हे कुणाच्याही कामानं होत नाही... हा एक करिश्मा आहे... देवाची इच्छा समजून घ्यायला हवी
- एवढा मोठा विजय, सफलता मिळते... तेव्हा मनुष्याच्या मनात अहंकार जागतो... तेव्हा सगळं काही संपतं... यामुळेच आमच्या सगळ्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना त्यांच्या कुटुंबीयांनी जागृत राहावं लागणार आहे.
- अहंकार जागला तर आपलं मिशन कधीच पूर्ण होणार नाही
- भाजपमध्ये अहंकार आला, म्हणून त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं
- गेल्या वर्षी, आम्हीही निवडून आलो आणि आमच्यातही अहंकार जागला... लोकसभेत त्याचं फळ आम्हाला मिळालं
- देवानं, दिल्लीच्या जनतेनं प्रेम आणि विश्वास दिलाय.... मी पुढची पाच वर्ष केवळ दिल्लीच्या जनतेची सेवा करेन... आपली कर्तव्य तन-मन-धनानं  पूर्ण करीन
- पाच वर्षांच्या आत दिल्लीतून भ्रष्टाचार संपून दाखवू... दिल्ली देशातलं पहिलं भ्रष्टाचार मुक्त 
- २८ डिसेंबर २०१३ ची घोषणा पुन्हा एकदा - तुमच्याकडून कुणी लाच मागितली तर नकार देऊ नका... तुमचा फोनवरून रेकॉर्डिंग करा... पैसे मागताना आवाज रेकॉर्ड करा... माझ्याकडे आणून द्या... त्याच्यावर आम्ही कडक कारवाई करू... यासाठी लवकरात लवकर टेलिफोन लाईन सुरु करतोय ज्या लाईनला ३९ दिवसांच्या सरकारात भ्रष्टाचारी घाबरायला लागले होते...
- मीडियाला विनंती... मी गाडीतून उतरलो की प्रश्न विचारले जातात
- आम्ही लवकरात लवकर कामं करू... पण, एकेक काम मजबुतीनं करू...
- मी, माझे मंत्री, माझी संपूर्ण टीम २४ तास काम करू
- मला ताप होता... आजही क्रोसिन खाऊन आलोय... तन-मन लावून काम करू
- गेल्या काही दिवसांत धार्मिक तेढ वाढवण्याचा प्रयत्न केला गेला... गेल्या ३५ वर्षांत आम्ही अशा घटना कधी पाहिल्या नव्हत्या... दिल्लीची लोकं शांतीप्रिय आहेत... अशा घटना सहन केल्या जाणार नाहीत
- त्या साऱ्या राजकीय शक्तींना सांगू इच्छितो की दिल्लीची लोक हे सहन करणार नाही. दिल्ली पोलीस दिल्ली सरकारमध्ये येत नाही... पण, आम्ही लवकरच असं शहर बनवू जिथं सगळ्या धर्माचे लोक आपल्याला सुरक्षित समजतील.
- केंद्र सरकार दिल्ली सरकारसोबत मिळून दिल्लीला एक चांगलं शहर बनविण्याचा प्रयत्न करील अशी आशा आहे
- भाजपनं दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची आश्वासनं देत होती... मी पंतप्रधानांना  हीच विनंती केली... तुम्ही आणि आम्ही ठरवलं तर दिल्लीला लवकरच पूर्ण राज्याचा दर्जा दिला जाऊ शकतो... आशा आहे, पंतप्रधान यावर सकारात्मक पद्धतीनं विचार करतील.
- पंतप्रधानांकडे खूप कामं आहेत.. त्यामुळे दिल्लीत एखादी घटना घडली तर ते वेळ देऊ शकत नाही... म्हणून मी त्यांना सांगितलं... दिल्लीचं सरकार चालवण्याचं काम दिल्लीच्या जनतेवर सोपवा.. तुम्ही देश चालवा...
- दोन शब्द व्यापाऱ्यांसाठी... दिल्लीच्या व्यापाऱ्यांनी या निवडणुकीत सहयोग दिला... सरकार चालविण्यासाठी पैसा हवाय... दिल्लीच्या व्यापाऱ्यांना 
कोणताही विभाग येऊन तुम्हाला त्रास देणार नाही, पैसे मागणार नाही... पण, सगळ्या लोकांनी आपला संपूर्ण टॅक्स भरा... टॅक्समधून तुमचा एकही पैसा चोरी होणार नाही... तुमच्या मुलांसाठी, वीजेसाठी-पाण्यासाठी, महिलांसाठी हा पैसा वापरला जाईल.
- सरकारमध्ये पैशाच्या कमी नाही... 'नियत'ची कमी आहे
- मी एक गोष्ट शिकलोय... जनतेला हृदयाशी धरा... जनता आपला विकास स्वत:च करते
- दिल्लीतून व्हीआयपी कल्चर हद्दपार करायचंय
- लाल बत्ती नाही घेणार... पण, गाडी नाही घेतली तर काम कसं करणार... मीडियाला विनंती, याची टर उडवू नका..
- पुढच्या तीन दिवसांत सुरु होईल, केजरीवाल मोठ्या बंगल्यात दाखल झालाय... मी खूप छोटा व्यक्ती आहे... आज माझ्या घरात चार-पाच रुम आहेत... पण, एका ऑफिसची तर गरज लागेल, नाहीतर काम कसं करणार..
- किरण बेदी यांचा खूप आदर करतो... निवडणुकीत हरणं - जिंकणं सुरुच असतं... माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणे आहेत.
- किरण बेदींना सोबत घेऊ... त्यांची मदत घेऊन काम करू
- अजय माकन यांना मोठा अनुभव... त्यांचीही मदत घेऊ
- श्रीमंत - गरीब दोघंही या शहरावर गर्व करू शकतील, असं शहर बनवायचंय
- आज, दिल्लीचा मुख्यमंत्री मी नाही तर दिल्लीचा प्रत्येक नागरिक बनलाय
- आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते सोनं आहेत... आम्हाला तरी पदं मिळालीत.. पण, त्या लोकांचं काय ज्यांनी आपल्या नोकरी, व्यवसाय सोडलेत... 
- टीम इंडियाला वर्ल्डकप जिंकण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.