‘भारतरत्न सचिन, खासदार रेखा... हा तर देशाचा अपमान’

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आणि प्रेस काऊन्सिलचे अध्यक्ष मार्कण्डेय काटजू यांनी सचिन तेंडुलकरला ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यावर टीका केलीय. एव्हढचं नव्हे तर सचिन आणि रेखाला खासदार बनवणं म्हणजे देशाचा अपमान करणं होय, असं काटजू यांनी म्हटलंय. 

Updated: Aug 9, 2014, 04:54 PM IST
‘भारतरत्न सचिन, खासदार रेखा... हा तर देशाचा अपमान’ title=

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आणि प्रेस काऊन्सिलचे अध्यक्ष मार्कण्डेय काटजू यांनी सचिन तेंडुलकरला ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यावर टीका केलीय. एव्हढचं नव्हे तर सचिन आणि रेखाला खासदार बनवणं म्हणजे देशाचा अपमान करणं होय, असं काटजू यांनी म्हटलंय. 

सोशल वेबसाईट ट्विटरवर काटजू यांनी आपलं हे मत मांडलंय. ‘तेंडुलकरला भारतरत्न देणं आणि रेखाला संसदेची सदस्य बनवणं म्हणजे देशाचा अपमान होता. भारतरत्न सुब्रह्मण्यम भारती, डॉ. कोटनिस आणि मिर्झा गालिब यांना दिलं जायला हवं होतं’ असं न्यायमूर्ती काटजू यांनी ट्विटरवर म्हटलंय. 

सोबतच त्यांनी सचिन तेंडुलकर आणि रेखाच्या संसदेतील गैरजरीबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. ‘राज्यसभेत तेंडुलकर आणि रेखाचं योगदान काय आहे? जर हा एक मोठा शून्य असेल तर मग त्यांना खासदार का बनवलं गेलं?’ असं त्यांनी म्हटलंय. 

यावेळी, त्यांनी काँग्रेस नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधलाय. ‘सोनिया गांधी एक अरब 25 करोड भारतीयांवर (ज्यांना त्या मूर्ख समजतात) राहुलला थोपवत आहेत... त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं इंदिरा गांधी यांनी आपल्यावर संजय गांधी यांना थोपवलं होतं’. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.