भूकंप पीडित ५०० अनाथ मुलांना बाबा रामदेव घेणार दत्तक

योग गुरू बाबा रामदेव यांनी नेपाळ मधील भूकंपात अनाथ झालेल्या ५०० बालकांना दत्तक घेण्याची घोषणा केली आहे. योगगुरू आचार्य बालकृष्ण यांच्यासोबत पंतजली योगपीठद्वारे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरानंतर बोलतांना, बाबा रामदेव यांनी घोषणा केली की भूकंप पीडितांना शक्य तितकी मदत केली जाईल. 

Updated: Apr 28, 2015, 11:46 AM IST
भूकंप पीडित ५०० अनाथ मुलांना बाबा रामदेव घेणार दत्तक title=

काठमांडू: योग गुरू बाबा रामदेव यांनी नेपाळ मधील भूकंपात अनाथ झालेल्या ५०० बालकांना दत्तक घेण्याची घोषणा केली आहे. योगगुरू आचार्य बालकृष्ण यांच्यासोबत पंतजली योगपीठद्वारे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरानंतर बोलतांना, बाबा रामदेव यांनी घोषणा केली की भूकंप पीडितांना शक्य तितकी मदत केली जाईल. 

पतंजली योगपीठ आणि त्याच्याशी जोडलेले स्वयंसेवक लोकांचे प्राण वाचवण्यासाठी रक्तदान करतील. तसेच बाबा रामदेव यांनी सांगितले की ५०० बालकांना आम्ही दत्तक घेणार आहोत. त्यांना पतंजलीमध्ये आश्रय दिला जाईल, तसेच १२वी पर्यंत त्यांच्या राहण्याची, जेवण्याची आणि शिक्षणाची सोय पतंजलीतर्फे केली जाईल. 

भूकंप पीडित जवळपास ५० हजार लोकांना वैद्यकीय सुविधा, जेवण, पाणी आणि गरजेच्या अन्य वस्तू पूरवल्या जातील. हे पूर्ण अभियान आचार्य बालकृष्ण यांच्या देखरेखीत पार पाडलं जाईल, असं बाबा रामदेव यांनी स्पष्ट केलं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.