बेळगाव : बेळगावात कन्नडीकांचा धिंगाणा सुरु आहे. हजारो कन्नड कार्यकर्ते शहरात दाखल झाले आहेत. त्यामुळे येळ्ळूर मध्येही ताणावाचं वातावरण आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कन्नड रक्षण वेदिका संघटनेचे अध्यक्ष नारायण गौडाला पोलिसांनी अटक केली आहे.
सीमावर्ती भागातल्या बेळगाव शहरात कन्नडीगांचा धांगडधिंगाणा सुरु आहे. कन्नड रक्षण वेदिका संघटनेचे कार्यकर्ते शहरात दाखल झालेत. या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केलीय .तसंच या संघटनेचे आणखी काही कार्यककर्तेही शहरात दाखल होण्याच्या तयारीत आहेत. या संपूर्ण प्रकरणामुळे येळ्ळूर गावातही तणाव निर्माण झालाय. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून कन्नड रक्षण वेदिका संघटनेचा अध्यक्ष नारायण गौडा यांच्यासह संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांना अटक केलीय.
दरम्यान, सीमावर्ती भागात मराठी भाषकांवर असलेले अन्याय तातडीने थांबवावे अन्यथा नाक दाबून तोंड उघडावं लागेल, असा इशारा शिवसेना नेते रामदास कदम यांनी दिला आहे. आमचे खासदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना याबाबत सांगतील. हा प्रकार थांबला पाहिजे, असे कदम म्हणालेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.