बिहार निवडणूक : शिवसेनेने घेतल्या भाजपच्या तीन विकेट

 बिहारमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल आता जवळपास स्पष्ट झाले असून जेडीयू नेतृत्त्वाखाली महाआघाडीला बहूमत मिळताना दिसत आहे.

Updated: Nov 8, 2015, 05:37 PM IST
बिहार निवडणूक : शिवसेनेने घेतल्या भाजपच्या तीन विकेट  title=

धनंजय शेळके, झी मीडिया, मुंबई :  बिहारमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल आता जवळपास स्पष्ट झाले असून जेडीयू नेतृत्त्वाखाली महाआघाडीला बहूमत मिळताना दिसत आहे.

या विधानसभा निवडणूक निकालाचे सात वैशिष्ट्ये आहे.

1)    भाजप आघाडी आणि नितीशकुमार आघाडी यांच्यातच मुख्य लढत झाली. या निवडणुकीत फारसे मतविभाजन झाले नाही.

2)    पप्पू यादव, समाजवादी पार्टी आणि राष्ट्रवादी काँगेस यांनी इतर छोट्या मोठ्या पक्षांनी बनवलेल्या आघाडीला बिहारी मतदारांनी पूर्णपणे नाकारलं.
3)    काही ठिकाणी त्यांना चांगली मते मिळाली असली तरी त्या बहुतक जागांवर नितीशकुमार आघाडीचेच उमेदवार निवडून आले.
4)    मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदार असूनही तिथे एमआयएमला फारशी करामत करता आली नाही. जागा जिंकणं तर सोडाच फक्त दोन ठिकाणी दुस-या क्रमांची मते मिळाली.
5)    शिवसेनेने 150 ठिकाणी उमेदवार उभे केले होते. त्यांना काही मोजक्याच ठिकाणी चांगली मते मिळाली असली तरी तीन जागांवर त्यांच्या उमेदवारामुळे भाजपचा पराभव झाला आहे.
6)    लोकसभेच्या तुलनेत भाजपच्या मतांमध्ये घट झाली. लोकसभा निवडणुकीत 29 टक्के मते मिळवलेल्या भाजपला फक्त 25 टक्के मते मिळाली.
7)    लोकजनशक्ती पक्षाला लोकसभेत 6 जागा मिळाल्या मात्र विधानसभा निवडणुकीत फक्त 3 जागा मिळाल्या....

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.