पुढील २४ तासांत युतीविषयी निर्णय घेतला जाईल - विनोद तावडे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नवीन आणि अंतिम प्रस्तावानंतर भारतीय जनता पक्षानं दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन आपली प्रतिक्रिया दिलीय. पुढील २४ तासांत युतीविषयी निर्णय घेतला जाईल आणि प्रत्यक्ष भेटूनच उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी म्हटलंय. 

Updated: Sep 21, 2014, 02:58 PM IST
पुढील २४ तासांत युतीविषयी निर्णय घेतला जाईल - विनोद तावडे title=

नवी दिल्ली: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नवीन आणि अंतिम प्रस्तावानंतर भारतीय जनता पक्षानं दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन आपली प्रतिक्रिया दिलीय. पुढील २४ तासांत युतीविषयी निर्णय घेतला जाईल आणि प्रत्यक्ष भेटूनच उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी म्हटलंय. 

आज भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक संपली आणि त्यानंतर दिल्लीत भाजपनं पत्रकार परिषद घेतली. शिवसेनेचा प्रस्ताव आम्ही ऐकला, युती कायम राहावी ही आमची इच्छा, मात्र युतीमध्ये कोणताही प्रस्ताव अंतिम नसतो, असं तावडे म्हणाले.  

युतीविषयीचे प्रस्ताव असे वृत्तवाहिन्यांमधून यायला नको, शिवसेनेला ५९ जागांवर तर भाजपला १९ जागांवर आत्तापर्यंत कधीच विजय मिळालेला नाही, या जागांवर चर्चाच झाल्यास युतीलाच फायदा होईल, ही आपली भूमिका पुन्हा भाजपनं बोलून दाखवली. 

२५ वर्षांपूर्वी युती झाली त्यावेळी लोकसभा निवडणुकीत भाजप ३२ आणि शिवसेना १६ जागांवर लढायची, आता शिवसेनेला सहा जागा वाढवून देण्यात आल्या आहेत, भाजपने नेहमीच शिवसेनेला मदत केली आहे, ज्यांच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री हेच युतीचं सूत्र, त्यामुळं मुख्यमंत्रीपदासाठी आम्ही शिवसेनेशी युती केलेली नाही, असं भाजपचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी म्हटलंय. 

भाजप आधीपासून ११९ जागा लढत आली आहे, यात नवीन काहीच नाही, शिवसेनेच्या प्रस्तावावर आम्ही समाधानी नाही असं सांगून चॅनलद्वारे चर्चा करण्याऐवजी प्रत्यक्ष भेटून चर्चा करणे योग्य, उद्धव ठाकरेंशी भेटूनच चर्चा करु, असंही खडसे म्हणाले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.