नवी दिल्ली : सणासूदीच्या दिवसात रेल्वेच्या जवळपास १२ लाख कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस मंजूर करण्यात आलाय.
अधिक वाचा : महागाईचा कहर, २ हजार मेट्रिकटन डाळीची आयात करणार
मोदी सरकारच्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर आधारित हा बोनस देण्यात येणार आहे. बोनस किती दिवसाचा मिळणार हे मात्र स्पष्ट झालेलं. बोनस दरवर्षीच मिळतो. पण यंदा हा बोनस कामगिरीच्या आधारावर कमी जास्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरसकट बोनस मिळण्याची प्रथा मोदी सरकार मोडीत काढणार, असे दिसून येत आहे.
२०१४ -२०१५ या चालू आर्थिक वर्षात ७८ दिवासांचा बोनस देण्याची घोषणा केली आहे. यामध्ये १२.५८ लाख निम शासकीय कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. कर्मचाऱ्यांना या महिन्यात ८,९७५ रुपये बोनस म्हणून मिळण्याची शक्यता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.