'चंदू परतल्यावरच होणार आजीच्या अस्थींचं विसर्जन'

चुकून नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानी हद्दीत गेलेले धुळ्याचे जवान चंदू चव्हाण यांना परत आणण्याची आशा त्यांच्या कुटुंबीयांना लागून राहिलीय. 

Updated: Oct 15, 2016, 09:22 AM IST
'चंदू परतल्यावरच होणार आजीच्या अस्थींचं विसर्जन' title=
डावीकडे चंदू चव्हाण आपल्या कुटुंबीयांसोबत

नवी दिल्ली : चुकून नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानी हद्दीत गेलेले धुळ्याचे जवान चंदू चव्हाण यांना परत आणण्याची आशा त्यांच्या कुटुंबीयांना लागून राहिलीय. 
 
चंदू चव्हाण यांना परत भारतात आणण्याच्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून त्यांचे आजोबा आणि भावाने परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली.

यावेळी, त्यांच्यासोबत सरंक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरेही होते. यावेळी चंदू चव्हाण यांना भारतात सुखरूप परत आणण्याचं आश्वासन स्वराज यांनी दिलं. 

दरम्यान, चंदू परतल्यावरच त्यांच्या आजींच्या अस्थींचं विसर्जन करू असा निर्णय चंदू यांच्या कुटुंबियांनी घेतलाय.