मम्मीच्या वयाच्या महिलेत अडकले त्याचे मन

 एका विद्यार्थ्यावर प्रेमाचं भूत असे काही होते की त्याने आपल्या मम्मीच्या वयाच्या महिलेमध्ये त्याचे मन अडकले. जेव्हा काही शक्य झाले नाही तेव्हा फोनवर अश्लिल मेसेज पाठवायला लागा. 

Updated: Dec 3, 2015, 05:37 PM IST
मम्मीच्या वयाच्या महिलेत अडकले त्याचे मन  title=

 हल्दवानी :  एका विद्यार्थ्यावर प्रेमाचं भूत असे काही होते की त्याने आपल्या मम्मीच्या वयाच्या महिलेमध्ये त्याचे मन अडकले. जेव्हा काही शक्य झाले नाही तेव्हा फोनवर अश्लिल मेसेज पाठवायला लागा. 
 
 पोलिसांनी शोध लावला तेव्हा या विद्यार्थ्याला पकडण्यात आले. त्यावेळी त्या महिलेच्या पायावर डोकं ठेवून माफी मागितली. झाले असे की काही दिवसांपूर्वी या मुलाला एका महिलेचा मोबाईल क्रमांक मिळाला. त्याने मस्करी म्हणून तिला रोमँटिक मेसेज पाठविले. असे करत असताना तो त्या महिलेत गुंतला. 
 
 महिलेचा काहीच उत्तर आले नाही तेव्हा त्याने तिला अश्लिल मेसेज पाठवायला लागला. महिलेने त्याला फोनवर समजविण्याचा प्रयत्न केला तरी त्याने अश्लिल मेसेज पाठविणे सुरू ठेवले. त्यानंतर महिलेने त्याची तक्रार हल्दवानीच्या सिव्हिल लाइन ठाण्यात केली. 
 
 पोलिस अधीक्षक नीरज भाकुनी यांनी सांगितले की, विद्यार्थ्याला पकडले तेव्हा तो खूप घाबरला, त्याने महिलाची माफी मागितली त्यानंतर महिला त्याच्यावर कारवाई करण्यास नकार दिला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.