अहमदाबाद : जाळपोळ आणि हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी गुजरातच्या जनतेला शांततेचं आवाहन केले आहे.
गुजरातमध्ये पटेल आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनानं हिंसक वळण घेतलंय.. पाटीदार नेता हार्दिक पटेल यांच्या अटकेनंतर अहमदाबाद, सूरत, राजकोट, मेहसाणासह अनेक शहरात जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्यात.. चार ते पाच शहरात जवळपास 50 हून अधिक गाड्या आंदोलनकर्त्यांनी पेटवून दिल्यात. मेहसाणामध्ये गुजरातचे गृहमंत्री रजनी पटेल यांच्या घरावरही दगडफेक करण्यात आली.
अधिक वाचा - हा २२ वर्षांचा मुलगा मोदींना चॅलेन्ज करतोय....!
तसंच गृहमंत्र्यांचं घर पेटवून देण्याचाही प्रयत्न झालाय.. पोलीस स्टेशन, पोलीस यांनाही आंदोलनकर्त्यांनी टार्गेट केलंय. वराछा परिसरात संचारबंदी लागू करण्यात आलीय.. गांधीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाही पेटवून देण्यात आलं.. या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्यात येणार आहेत.. खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेट सेवाही बंद करण्यात आलीय.
अधिक वाचा - अहमदाबाद, सुरत, मेहसाणामध्ये कर्फ्यू
हार्दिक पटेल यांनी आज गुजरात बंदची हाक दिलीय. मुदतीपेक्षा जास्त वेळ आंदोलन केल्यानं पोलिसांनी पटेल यांना अटक केली होती. या अटकेचा विरोध करणा-या जमावाला रोखण्यासाठी पोलिसांना बळाचा वापरही करावा लागला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.