९ वर्षांच्या मुलावर 'कायदा आणि सुव्यवस्थेचं' उल्लंघन केल्याचा गुन्हा

 राज्यात कायद्याचं आणि सुरक्षित वातावरण राखण्यास अपयशी ठरत असल्यामुळं टीकेचे धनी होत असलेल्या उत्तर प्रदेश पोलिसांनी आणखी एक कारनामा केला आहे. 'कायदा व सुव्यवस्थेचं' वातावरण बिघडवल्याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी तिसरीत शिकणाऱ्या अवघ्या ९ वर्षांच्या मुलावर गुन्हा दाखल केला.

Updated: Aug 8, 2014, 12:47 PM IST
९ वर्षांच्या मुलावर 'कायदा आणि सुव्यवस्थेचं' उल्लंघन केल्याचा गुन्हा title=

आग्रा:  राज्यात कायद्याचं आणि सुरक्षित वातावरण राखण्यास अपयशी ठरत असल्यामुळं टीकेचे धनी होत असलेल्या उत्तर प्रदेश पोलिसांनी आणखी एक कारनामा केला आहे. 'कायदा व सुव्यवस्थेचं' वातावरण बिघडवल्याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी तिसरीत शिकणाऱ्या अवघ्या ९ वर्षांच्या मुलावर गुन्हा दाखल केला.

फिरोजाबाद जिल्ह्यातील टुंडला पोलिसांनी ही कारवाई केली असून त्या मुलाच्या वडिलांनाही अटक करण्यात आली होती. अखेर नातेवाईकांनी न्यायालयात धाव घेतल्यावर त्या मुलाला गुरूवारी जामीनावर सोडण्यात आलं. 

हे प्रकरण आहे १८ जुलैचं... कुर्रा गावातील या मुलाच्या कुटुंबियांनी पाळलेली गुरं-ढोरं दुसऱ्या गावकऱ्याच्या शेतात घुसली आणि त्यांनी पिकांचं नुकसान केलं. या घटनेनंतर त्या मुलाची दुसऱ्या मुलाशी बाचाबाची झाली ज्याचं रुपांतर नंतर मोठ्या भांडणात झालं. ५ ऑगस्ट रोजी पोलीस त्या मुलाच्या घरी गेले आणि त्यांनी वडिलांसह त्या मुलाला ताब्यात घेतलं.  त्यांचं काहीही ऐकून न घेता पोलिसांनी त्यांच्यावर कलम १०७/११६ अंतर्गत कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा गुन्हा दाखल केला. 

मात्र पोलिसांनी हे वृत्त फेटाळलं असून त्या मुलाला ताब्यात घेतल्याचं नाकारलं, तसंच आपण फक्त त्या मुलाच्या वडिलांची काही तास चौकशी केल्याचं पोलिसांनी सांगितलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.