नवी दिल्ली: राजधानी दिल्ली पुन्हा एकदा हादरलीय. दिल्लीतील मलकागंज भागात एका 77 वर्षीय वृद्ध व्यक्तीनं 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकरा घडलाय. वृद्ध मागील 10-12 दिवसांपासून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करत होता. पीडित मुलगी पश्चिम बंगालची राहणारी आहे. पोलिसांनी आरोपी वृद्धाला अटक केलीय.
पीडित मुलगी मलकागंजमध्ये महेंद्र सेहगल यांच्याकडे मागील अडीच महिन्यांपासून घरकामाला होती. महेंद्र मागील 10-12 दिवसांपासून तिच्यावर बलात्कार करत होता. एवढंच नव्हे तर बलात्कार करण्यापूर्वी तो मुलीला अश्लील फिल्म्सही दाखवत होता. महेंद्रच्या घरातून पोलिसांनी ब्लू फिल्म्सच्या सीडीही जप्त केल्या आहेत.
शनिवारी रात्री महेंद्र पुन्हा एकदा मुलीवर बलात्का करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र मुलीनं विरोध केला तर तो तिला मारू लागला. आवाज ऐकून शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन केला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळं परिसरातल्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.