सर्वाधिक कमाई करणाऱ्यांच्या यादीत धोनी, कोहली, सचिन

फोर्ब्सने जारी केलेल्या यादीनुसार भारतात सर्वाधिक कमाई करणाऱ्या अव्वल दहांमध्ये भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनी, कसोटी कर्णधार विराट कोहली, माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा समावेश झाला आहे. 

Updated: Dec 11, 2015, 04:00 PM IST
सर्वाधिक कमाई करणाऱ्यांच्या यादीत धोनी, कोहली, सचिन title=

नवी दिल्ली : फोर्ब्सने जारी केलेल्या यादीनुसार भारतात सर्वाधिक कमाई करणाऱ्या अव्वल दहांमध्ये भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनी, कसोटी कर्णधार विराट कोहली, माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा समावेश झाला आहे. 

ऑक्टोबर २०१४ ते ३० सप्टेंबर २०१५ या कालवाधीदरम्यान सर्वाधिक कमाई करणाऱ्यांच्या यादीत बॉलीवूड आणि क्रिकेटरचा अधिक बोलबाला आहे. क्रिकेटरांच्या यादीत धोनी सर्वात अव्वल स्थानी आहे. धोनी ११९.३३ कोटी रुपये वर्षाला कमावणारा धोनी एकूण यादीत चौथ्या स्थानी आहे. तर कसोटी कर्णधार सातव्या स्थानी आहे. याची कमाई आहे १०४.७८ कोटी रुपये आहे. त्यापाठोपाठ माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा नंबर लागतो. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत मालिकावीराचा पुरस्कार मिळवणाऱा क्रिकेटर रविचंद्रन अश्विन पहिल्यांदा या यादीत सामील झालाय. या यादीत अश्विन ३१व्या स्थानी आहे. या यादीत सुपरस्टार शाहरुख खान पहिल्या स्थानी आहे. सलमान खान दुसऱ्या आणि अमिताभ बच्चन तिसऱ्या स्थानी आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.