स्फोटाचं राजकारण : मोदींवर निशाणा

बिहारमधल्या बोधगयामध्ये झालेल्या स्फोटाचं राजकारण सुरु झालंय. नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केलेल्या भाषणात नितीशकुमारांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे, असं आवाहन केलं होतं...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jul 8, 2013, 02:49 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
बिहारमधल्या बोधगयामध्ये झालेल्या स्फोटाचं राजकारण सुरु झालंय. नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केलेल्या भाषणात नितीशकुमारांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे, असं आवाहन केलं होतं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे रविवारी पहाटेच बिहारमध्ये बॉम्बस्फोट झाले. या दोन घटनांना एकत्र करत दिग्विजय सिंह यांनी ट्विटरवर एकच खळबळ उडवून दिलीय.

‘नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या कार्यकर्त्यांसमोर भाषण केले या भाषणांत त्यांनी नितीशकुमारांना धडा शिकवण्याची मागणी केली या भाषणाच्या दुसऱ्याच दिवशी स्फोट झाले. या दोन्हीमध्ये काही परस्पर संबंध आहे का? मला नेमकी कल्पना नाही... कृपया ‘एनआयए’ ला याचा तपास करण्याची परवानगी द्यावी’ असं ट्विट करत दिग्विजय सिंह यांनी अप्रत्यक्षपणे या दोन घटनांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केलाय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.