दिग्विजय सिंग आणि अमृताचं लवकरच शुभमंगल !

असं वाटतेय की, मध्यप्रदेशातील राजगड जिल्ह्यातील राघोगड किल्ल्यावर एक राजेशाही लग्न होण्याची शक्यता आहे. 

Updated: Jun 24, 2014, 02:12 PM IST
 दिग्विजय सिंग आणि अमृताचं लवकरच शुभमंगल ! title=

मुंबई : असं वाटतेय की, मध्यप्रदेशातील राजगड जिल्ह्यातील राघोगड किल्ल्यावर एक राजेशाही लग्न होण्याची शक्यता आहे. 

ऐकण्यात येतेय की, एक राजेशाही लग्न होईल ते कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग आणि पत्रकार अमृता रॉय यांचं.

काही फोटो इंटरनेटवर लीक झाल्यानंतर दोघांनी आपल्या नात्याचा खुलासा केला होता. 

21 जूनला राघोगडची छोटी राणी आणि लक्ष्मण सिंगची बायको रुबीना शर्मा सिंगने टविट केले.
'घरात लवकरच लग्नाची सनई वाजणार आहे.

 

मात्र त्यानंतर काही वेळातच तिने आणखी एक ट्विट केले की, 'उफ...घरात अजूनही माणसं उपस्थित आहेत.'

गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात दिग्विजय सिंग यांच्या बायकोची दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांनी अमृतासोबत लग्न करणार असल्याची बातमी दिली होती.

या दोघांची काही फोटो इंटरनेटवर व्हायरल झाली होती. त्याच्यानंतर 30 एप्रिलला दिग्विजय सिंगने अमृतासोबत नात्याचा स्वीकार केला होता. 

दिग्विजय सिंग रुबीनाचं मेहुणे लागतात. लक्ष्मण सिंग आणि रुबीनाच्या लग्नाला दिग्विजयांचा विरोध होता. 

रुबिना आणि लक्ष्मण सिंगच्या वयात 13 वर्षाचा फरक आहे. रुबिना राजपूत घराण्यांची नसल्याने दिग्विजय सिंग यांनी लग्नासाठी आक्षेप केला होता. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.