तामिळनाडूतील मंदिरांमध्ये एक जानेवारीपासून ड्रेस कोड लागू

तामिळनाडूच्या विविध मंदिरात दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या भक्तांना नव्या वर्षात एक जानेवारीपासून ड्रेस कोड घालणे बंधनकारकर असणार आहे. अनेक तीर्थस्थळांनी याबाबतची सूचना नोटीस बोर्डावर लिहीली आहे. 

Updated: Dec 31, 2015, 03:17 PM IST
तामिळनाडूतील मंदिरांमध्ये एक जानेवारीपासून ड्रेस कोड लागू title=

मदुराई : तामिळनाडूच्या विविध मंदिरात दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या भक्तांना नव्या वर्षात एक जानेवारीपासून ड्रेस कोड घालणे बंधनकारकर असणार आहे. अनेक तीर्थस्थळांनी याबाबतची सूचना नोटीस बोर्डावर लिहीली आहे. 

मद्रास उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पलानी मंदिराबाहेर लावण्यात आलेल्या सूचनेनुसार पुरुष भक्तांना धोतर, शर्ट, पायजमा अथवा पँट-शर्ट घालण्यास सांगितले आहे.

तर महिला साडी अथवा चुडीदार घालू शकतात. तसेच जे लोक लुंगी, बर्म्युडा, जीन्स अथवा लेगिंग्स घालून येतील त्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नसल्याचेही या सूचनेत नमूद करण्यात आलेय.

नोव्हेंबरमध्ये मद्रास हाय कोर्टाने मंदिरात भक्तांना ड्रेस कोड लागू करण्याचे आदेश दिले होते. यामुळे मंदिरातील आध्यात्मिक वातावरण कायम राहील असे कोर्टाने नमूद केले होते.