नवी दिल्ली : सामान्य लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इनकम टॅक्स डिपार्टमेंटने सगळ्या टॅक्स भरणाऱ्या व्यक्तींसाठी ई फाइलिंग सुविधा सुरु केली आहे. आता सर्व आयकरदाता https://incometaxindiaefiling.gov.in/
वर जाऊन ३१ जुलैपर्यंत आयकर रिटर्न फाईलसाठी अर्ज करु शकता. ऑनलाईन इनकम टॅक्स रिट्रन दाखल करण्यासाठी तुम्हाला आधी काही आवश्यक कागदपत्र असणं आवश्यक आहे. यामध्ये मागच्या वर्षाची इनकम टॅक्स रिटर्न कॉपी, बँक स्टेटमेंट, टीडीएस आणि बचत प्रमाणपत्र आणि फॉर्म 60 आवश्यक आहे. आयटीआरचं ई-वेरीफिकेशन आधार नंबरच्या माध्यमातून तुम्ही ते भरु शकता.
चालू वित्तीय वर्षाच्या आधारे आधी 2,59,831 आयटीआरचं ई-वेरीफिकेशन केलं गेलं आहे. १ जुलै २०१७ पासून पॅनकार्डसाठी आधार क्रमांक आवश्यक असणार आहे.