दिल्लीत उबेर टॅक्सी सर्व्हिसवर बंदी, टॅक्सीचालकाचा गुन्हा उघड

दिल्लीत उबेर टॅक्सी सर्व्हिसवर तात्काळ बंदी घालण्यात आलीय. शुक्रवारी एका महिलेवर टॅक्सी ड्रायव्हरनं बलात्कार केल्याची घटना घडली. त्यानंतर दिल्लीत सरकारनं हा निर्णय घेतलाय. एका टॅक्सी सेवेत रजिस्टर्ड ड्रायव्हरनं असं कृत्य केल्यानं आता दुसऱ्या कॅब ऑपरेटर्सवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. 

Updated: Dec 8, 2014, 04:16 PM IST
दिल्लीत उबेर टॅक्सी सर्व्हिसवर बंदी, टॅक्सीचालकाचा गुन्हा उघड title=

नवी दिल्ली: दिल्लीत उबेर टॅक्सी सर्व्हिसवर तात्काळ बंदी घालण्यात आलीय. शुक्रवारी एका महिलेवर टॅक्सी ड्रायव्हरनं बलात्कार केल्याची घटना घडली. त्यानंतर दिल्लीत सरकारनं हा निर्णय घेतलाय. एका टॅक्सी सेवेत रजिस्टर्ड ड्रायव्हरनं असं कृत्य केल्यानं आता दुसऱ्या कॅब ऑपरेटर्सवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. 

टॅक्सी सेवा देणारी अमेरिकेची कंपनी उबेरनं या घटनेनंतर आपलं गुडगावचं ऑफिस बंद केलंय. पोलिसांनी उबेर कंपनीच्या अधिकाऱ्यांची चौकशी केलीय. 

तर २७ वर्षीय महिलेवर बलात्कार करणारा टॅक्सी चालक यादवनं यापूर्वीही असं कृत्य केल्याचंही उघडकीस आलं असून त्या गुन्ह्यासाठी त्यानं ७ महिन्यांची शिक्षाही भोगली आहे. २०११ साली त्यानं लैंगिक अत्याचार केला होता, असं पोलिसांच्या चौकशीतून समोर आलं आहे. 

आरोपी शिवकुमार यादव (३२) हा एका आंतरराष्ट्रीय कॅब बुकिंग सर्व्हिस उबेरचा टॅक्सीचालक आहे. तो उत्तर प्रदेशच्या मथुरा इथला रहिवासी आहे. पीडित महिला शुक्रवारी रात्री यादवच्या टॅक्सीत बसून घरी परत जात होती. शिवकुमार यानं टॅक्सी एका निर्जन स्थळी थांबविली आणि टॅक्सीचं दार आणि खिडक्या लॉक केल्या. त्यानंतर त्यानं प्रवासी महिलेवर बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी यादवला रविवारी मथुरा इथून अटक केली. 

चौकशीदरम्यान त्यानं २०११ सालीही असा गुन्हा केला होता आणि त्याप्रकरणी त्यानं सात महिने तुरूंगातही काढले होते. मात्र यामुळं टॅक्सी कंपन्या कामावर ठेवण्यापूर्वी चालकांची पार्श्वभूमी तपासून पाहतात की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

दरम्यान बलात्काराच्या या प्रकरणांनतर दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून या घटनेच्या निषेधार्थ आज सकाळी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली. तर बलात्काराची ही घटना अतिशय दुर्दैवी आणि शरमेची बाब असल्याची प्रतिक्रिया राजनाथ सिंग यांनी व्यक्त केली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.