श्रीनगर: काश्मीरच्या बारामुल्लामध्ये अतिरेकी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. यात एक पोलीस आणि एक जवान शहीद झालाय. तर एक नागरिकही जखमी झालाय.
तीन दहशतवादी सीमेपलीकडून भारतीय हद्दीत घुसले असून कुंझर गावात दडून बसल्याची खबर सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस आणि लष्करानं कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं.
त्यावेळी अतिरेक्यांनी जवानांच्या दिशेनं गोळीबार सुरू केला. त्याला जवानांनी चोख प्रत्त्युत्तर दिलंय...
पाहा हा थरारक व्हिडिओ -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.