तमिळनाडूत अम्मा, बंगालमध्ये पुन्हा ममता, आसाममध्ये भाजप, केरळममध्ये एलडीएफ

 आसाममध्ये भाजपची जोरदार मुसंडी, ममतांचं कमबॅक, जयललितांचा अनपेक्षित विजय आणि केरळमध्ये काँग्रेसची गच्छंती झालीये.

Updated: May 19, 2016, 06:04 PM IST
तमिळनाडूत अम्मा, बंगालमध्ये पुन्हा ममता, आसाममध्ये भाजप, केरळममध्ये एलडीएफ  title=

नवी दिल्ली : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागतायत... यात आसाममध्ये भाजपची जोरदार मुसंडी, ममतांचं कमबॅक, जयललितांचा अनपेक्षित विजय आणि केरळमध्ये काँग्रेसची गच्छंती झालीये... पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात मात्र काँग्रेसनं निसटतं बहुमत मिळवलंय... पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या जागा आणखी वाढल्यात. दोन तृतियांश बहुमतासह त्यांनी डाव्यांना आणखी कोपऱ्यात ढकललंय. 27 तारखेला ममतांचा शपथविधी होणार आहे... 

तामिळनाडू (२३४)

तिकडे तामिळनाडूत मात्र एक्झिट पोलचे अंदाज खोटे ठरवत, जनतेनं पुन्हा एकदा जयललितांना सत्तेवर बसवलं. एकूण 232 जागांपैकी निम्म्याहून अधिक जागा मिळवून अण्णा द्रमुक पक्षाची सत्ता कायम राखण्यात जयललितांना यश आलंय.  तामिळनाडूत कुटुंबाच्या राजकारणाला जनतेनं तिलांजली दिल्याचा दावा जयललितांनी केला. त्याचप्रमाणे तामिळनाडूला प्रत्येक क्षेत्रात नंबर एकचं राज्य बनविण्याचा विडाही जयललितांनी आज उचलला.. 

तामिळनाडूत जयललिता यांच्या एआयडीएमके याने ११५ जागांवर आघाडी घेतली असून ९ जागांवर विजय मिळविला आहे. दुसऱ्या स्थानावर डीएमके असून त्यांनी ९७ जागांवर आघाडी घेतली असून पाच स्थानांवर विजय मिळविला आहे. भाजपला या ठिकाणी खातं खोलता आलं नाही. 

पश्चिम बंगाल (२९४)

 पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या जागा आणखी वाढल्यात. दोन तृतियांश बहुमतासह त्यांनी डाव्यांना आणखी कोपऱ्यात ढकललंय. 27 तारखेला ममतांचा शपथविधी होणार आहे... तृणमूलच्या कार्यकर्त्यांचा संपूर्ण बंगालमध्ये जल्लोष सुरू झालाय...

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची सेकंड इनिंग सुरू होणार असून सर्वाधिक १८८ जागांवर आघाडी घेतली असून २० जागांवर विजय मिळविला आहे. तर दुसऱ्या स्थानावर काँग्रेसने ४४ जागांवर आघाडी घेतली असून १ जागेवर विजय मिळविला आहे.  सीपीएम ३३ जागांवर आघाडी घेतली आहे. 

आसाम (१२६)

आसाममध्ये सर्बानंद सोनवाल यांच्या नेतृत्वात भाजपला दोन तृतीयांश बहुमत मिळालंय. त्यामुळे काँग्रेसनं आणखी एक राज्य गमावलंय.  तर ईशान्येच्या सात राज्यांमध्ये भाजपची पहिली सत्ता मिळालीय. तब्बल 15 वर्ष सत्तेत राहिल्यावर आता तरूण गोगोईंना पायउतार व्हावं लागणार आहे.

आसाममध्ये भाजपने १५ वर्षांचे काँग्रेसचे सरकार उलथवून लावले आहे. आतापर्यंत भाजप ७९ जागांवर आघाडी घेतली असून ६ जागेंवर त्यांनी विजय मिळविला आहे. काँग्रेस दुसऱ्या स्थानावर असून त्यांनी २४ जागांवर आघाडी घेतली असून १ जागेवर विजय मिळविला आहे. तर एआययूडीएफ आणि मित्रपक्ष ११ जागेवर आघाडी घेतली असून १ जागेवर विजय मिळविला आहे. 

केरळ (१४०)

केरळमध्ये काँग्रेसला जोरदार झटका देत जनतेनं पुन्हा एकादा डाव्या आघाडीच्या पारड्यात कौल दिला. व्ही. एस. अच्युत्तानंद यांनी 94 वर्षीं कार्यकर्त्यांना एकत्र आणून काँग्रेसला धूळ चारली. 

केरळमध्ये एलडीएफने ३३ जागांवर आघाडी घेतली असून ५० जागांवर विजय मिळविला आहे. यूडीएफने २१ जागांवर आघाडी घेतली असून २५ स्थानांवर विजय मिळविला आहे. इतर ४ स्थानांवर आघाडीवर असून ६ स्थानावर विजय मिळविला आहे. 

पद्दूचेरी (३०)

पुद्दूचेरीत काँग्रेसने ११ जागांवर विजय मिळविला असून ३ जागांवर अजून आघाडी घेतली आहे. एआयएडीएमकेने २ जागांवर आघाडी घेतली असून दोन जागांवर विजयी आहेत. इतर ९ जागांवर विजय मिळवला असून २ जागांवर आघाडीवर आहे. 

 

LIVE : पश्चिम बंगालचा निकाल

LIVE : तामिळनाडूचा निकाल

LIVE : आसामचा निकाल

LIVE : केरळचा निकाल

LIVE : पद्दुचेरीचा निकाल 

पाच राज्यातल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. 

आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि पद्दुचेरीमध्ये16 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालीय. आज सकाळी आठ वाजल्यांपासून मतमोजणी सुरु होईल आणि दुपारी तीन वाजेपर्यंत मतमोजणी पूर्ण होईल. 

आसाममध्ये तरुण गोगोई, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी, तामिळनाडूमध्ये जयललिता, केरळमध्ये ओमेन चंडी आणि पद्दुचेरीमध्ये रंगास्वामी या दिग्गज नेत्यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. या पाचही राज्यात एकाच वेळी मतमोजणी होणार आहे. 

एक्झिट पोलच्या अंदाजानुसार पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींची सत्ता कायम राहील. तर तामिळनाडू, केरळ, आणि आसाममध्ये सत्ता पालट होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.