www.24taas.com, झी मीडिया, भोपाळ
नोकरांचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी मध्यप्रदेशचे अर्थ मंत्री राघवजी यांना अगोदर आपलं पद गमवावं लागलं आणि आता त्यांना पोलीस कोठडीची हवाही खावी लागलीय.
राघवजी यांना पोलिसांनी मंगळवारी भोपाळ पोलिसांनी जुन्या शहरातील कोहेफिजा भागातील एका फ्लॅटमधून ताब्यात घेतलं.
नोकरानं पोलिसांत तक्रार केल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून राघवजी बेपत्ता झाले होते. ‘राघवजीचा पीडित नोकर राजकुमार दांगी यानं तक्रार दाखल केल्यानंतर तात्काळ भोपाळ पोलीस राघवजीचा शोध घेत होते. त्यांना शोधून काढण्यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी छापेही घातले. परंतू आज सकाळी राघवजी कोहेफिजा भागातील आपल्या परिचितांच्या घरात लपून बसल्याची माहिती आम्हाला मिळाली आणि आम्ही त्यांना ताब्यात घेतलं’ असं भोपाळचे पोलीस महानिरीक्षक उपेन्द्र जैन यांनी म्हटलंय. पोलिसांनी या फ्लॅटचं टाळं तोडून आत प्रवेश केला आणि तिथं त्यांना लपून बसलेले राघवजी हाती लागले.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.