www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दिल्ली मेट्रो पूर्णत: सुरक्षित असल्याचा दावा केला जातो परंतु, याच मेट्रोमध्ये अश्लील एमएमएस आणि पॉर्न व्हिडिओ बनवण्यात येत असल्याचं आता उघड झालंय.
दिल्ली मेट्रोमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून हे अश्लील एमएमएस आणि पॉर्न व्हिडिओ बनवण्यात आलेत. याहूनही हे धक्कादायक म्हणजे हे व्हिडिओ पॉर्न साईटवर अपलोडही करण्यात आलेत. आत्तापर्यंत जवळजवळ १३ पॉर्न साइटस आणि इतर साइटसवर हे अश्लील व्हिडिओ अपलोड करण्यात आल्याचं उघड झालंय. हे व्हिडिओज आणि एमएमएस आत्तापर्यंत दीड लाखांहून जास्त लोकांनी पाहिलेत.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, दिल्ली मेट्रोमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी सीआयएसएफ आणि डीएमआरसीकडे आहे. दिल्ली मेट्रोतून प्रवास करणाऱ्या जोड्यांच्या कॅमेऱ्यात कैद झालेल्या अश्लील हरकतींवर आत्तापर्यंत अडीचशेहून अधिक एमएमएस बनविले गेलेत. गेल्या दोन वर्षांपासून हा कारभार बिनबोभाट सुरू आहे.
यामुळे आता मेट्रोच्या सीसीटीव्ही फुटेजच्या सुरक्षेची जबाबदारी चव्हाट्यावर आलीय. हे फुटेज कोणी पॉर्न साइटसवर अपलोड केले आणि अधिकाऱ्यांना याबद्दल जराही शंका कशी आली नाही? अशा अनेक मुद्द्यांची चौकशी पोलिसांना करावी लागणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.