नवी दिल्ली : पुढील वर्षी येणा-या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वा होलांद हे उपस्थित रहाणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात होलांद यांना निमंत्रण दिले आणि त्यांनी ते स्वीकारले अशी माहिती सूत्रांनी दिलीये. फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री लॉलेण्ट फॅबिअस हे शुक्रवारी दिल्लीत होते तेव्हा त्यांनी होलांद यांनी निमंत्रण स्वीकारल्याची माहिती दिलीये.
यापूर्वी गेल्या वर्षी प्रजासत्ताक दिनी प्रमुख अतिथी म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी हजेरी लावली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.