तुमच्याकडे 500, 1000च्या नोटा असतील तर तुम्ही काय कराल?

चलनातून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा आज मध्यरात्रीपासून रद्द करण्यात आल्या आहेत. तशी मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्यामुळे तुमच्याकडे 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा असतील तरी तुम्ही घाबरुन जाऊ नका.

Updated: Nov 8, 2016, 09:33 PM IST
तुमच्याकडे 500, 1000च्या नोटा असतील तर तुम्ही काय कराल? title=

नवी दिल्ली : चलनातून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा आज मध्यरात्रीपासून रद्द करण्यात आल्या आहेत. तशी मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्यामुळे तुमच्याकडे 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा असतील तरी तुम्ही घाबरुन जाऊ नका.

तुम्ही या नोटा बदलू शकता. त्यासाठी काही कालावधी दिलेला आहे. त्याच कालावधीत बदला. नाहीतर तुम्हाला रिर्झव्ह बॅंकेत चकरा मारव्या लागतील. ज्याचे पैसे आहेत त्यानेच त्यांचे पैसे बॅंकेत भरावयाचे आहेत. दुसऱ्याकडे पैसे देऊ नये.

- 10 ते 24 नोव्हेंबर 4 हजार रुपये बॅंकेतून किंवा एटीएममधून काढता येणार
- 15 दिवसांपासून याची मुदत वाढ
- 31 डिसेंबर 2016 पर्यंत नोटा बदलून मिळणार आहेत.
- 31 डिसेंबरनंतर थेट रिर्झव्ह बॅंकेत नोटा बदलाव्या लागतील.
 - उद्या बॅंका बंद, एटीएम  9 नोव्हेंबर आणि 10 नोव्हेंबर या दोन दिवशी बंद राहणार
- बॅंक तसेच एटीएममधून प्रतिदिन 2000 रुपये काढू शकता.
- बॅंकेत पैसे जमा करताना तुमच्याकडे पॅन नंबर किंवा आधार कार्ड बंधनकारक असणार आहे.
- 10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर 2016 पर्यंत 4000 हजार पर्यंत तुम्ही बँकेतील खात्यात पैसे जमा करू शकतात. 
- तुम्ही 500 आणि 1000च्या नोटा तुमच्या खात्यात जमा करू शकणार आहेत. 
- 4000 हजार पर्यंत नोटा बदलत्या येणार आहे. 
- त्यानंतर 15 दिवसांनंतर आणखी एक संधी देण्यात येणार आहे. 
- पुढच्या 50 दिवसात बँका जमा कराव्या लागणार आहेत. 
- आता नवीन नोटा उपलब्ध होईपर्यंत खात्यातून दररोज 10 हजार आणि आठवड्यातून 20000 काढण्याची देण्यात आली आहे. 
- पेट्रोलपंप, हॉस्पीटलमध्ये  500 आणि 1000च्या नोटा तीन दिवस चालतील.