किरण बेदींबद्दलचं ट्विट `बोगस` - गडकरी

दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून पक्षानं किरण बेदी यांना कधीही पसंती दिली नाही, असं स्ष्टीकरण भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी दिलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 16, 2014, 04:40 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून पक्षानं किरण बेदी यांना कधीही पसंती दिली नाही, असं स्ष्टीकरण भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी दिलंय.
`हे तथाकथित ट्विटचं काम खोटारड्या अकाऊंटचं आहे. त्याचा माझ्याशी, माझ्या ट्विटर अकाऊंटशी किंवा भाजपशी काही एक देणं-घेणं नाही` असं नितीन गडकरी म्हणतायत.
ज्या ट्विटर हँडलवरून ट्विट पाठवलं गेलं त्यांच्याही म्हणण्यानुसार हे एक फेक अकाऊंट होतं. गडकरींच्या नावाने केलेल्या या ट्विटमध्ये `दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजप तयार... मुख्यमंत्रीपदासाठी केजरीवाल यांच्याविरोधात किरण बेदी असतील भाजपच्या उमेदवार` असं म्हटलं होतं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.