महाराष्ट्र सदनात गणेशोत्सव अनिश्चित?

राजधानी दिल्लीत स्वतःचं खास वैशिष्ट्य जपणा-या महाराष्ट्र सदनातील सार्वजनिक गणेशोत्सवावर यंदा अनिश्‍चिततेची टांगती तलवार आहे. 

Updated: Aug 4, 2014, 11:27 PM IST
महाराष्ट्र सदनात गणेशोत्सव अनिश्चित?  title=

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत स्वतःचं खास वैशिष्ट्य जपणा-या महाराष्ट्र सदनातील सार्वजनिक गणेशोत्सवावर यंदा अनिश्‍चिततेची टांगती तलवार आहे. 

सदनाची सार्वजनिक गणेशोत्सव समिती दरवर्षी सदनाच्या प्रांगणात गणपती उत्सव साजरा करते, पण या वर्षी अजून काही हालचाली नाही, मनुष्यबळ कमी आहे, असं कारण पुढे केले जात आहे. 

मात्र महाराष्ट्र सदनात गणेशोत्सव साजरा होणार असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. 

राज्याच्या शासनाचा येथील गणेशोत्सवाशी संबंधच नाही, अशी भूमिका महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त बिपीन मलिक यांनी घेतलीय. महाराष्ट्र सदनाच्या सेवेत सध्या कागदोपत्री 110 कर्मचारी आहेत. त्यातील 70 ते 75 लोकांवर नवीन व जुने अशा दोन्ही सदनांची जबाबदारी असल्याने सध्या येथे कर्मचाऱ्यांची वानवा जाणवते. 

यातील अनेकजण नवीन आहेत. गेल्या 17 वर्षांची परंपरा असलेल्या या गणेशोत्सवात वरिष्ठांची नाराजी पत्करून यंदा कितीजण सहभागी होतील, याबद्दल साशंकता आहे. दरम्यान महाराष्ट्र सदनात गणेशोत्सव व्हायलाच हवा, असं मत राजकीय नेते आणि ज्येष्ठ पत्रकारांनी व्यक्त केलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.