नवी दिल्ली: कामचोर सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारनं जोरदार दणका दिला आहे. काम न करणाऱ्या आयकर विभागाच्या 33 कर्मचाऱ्यांना वेळेआधीच निवृत्ती देण्यात आली आहे. यामध्ये 7 ग्रुप ए मधल्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
अर्थखात्यानं याबाबतचं पत्र प्रसिद्ध करून ही माहिती दिली आहे. तसंच इतर खात्यांमधल्या एकूण 72 कर्मचाऱ्यांचीही हकालपट्टी करण्यात आली आहे, यामध्ये सहा ग्रुप ए अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
कामचोर कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याचं आजपर्यंत बोललं जात होतं. हा समज दूर करण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचंही या पत्रात नमुद करण्यात आलं आहे.