शहिदाच्या पत्नीची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल

माछिल सेक्टरमधील दहशतवादी हल्ल्यातील शहिद प्रभू सिंह यांच्या पत्नी तब्येत बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलंय. 

Updated: Nov 23, 2016, 11:12 PM IST
शहिदाच्या पत्नीची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल title=

जोधपूर : माछिल सेक्टरमधील दहशतवादी हल्ल्यातील शहिद प्रभू सिंह यांच्या पत्नी तब्येत बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलंय. 

शहिद प्रभू सिंह हे मुळचे जोधपूरचे रहिवासी होते. प्रभू सिंह शहीद झाल्याची बातमी समजताच त्यांच्या कुटुंबीयांच्या पायाखालून सरकली. 

प्रभू सिंह यांच्या निधनाचं वृत्त समजताच त्यांची पत्नी ओम कंवर बेशुद्ध झाल्या. त्यांना मानसिक धक्का बसला होता. थोड्या-थोड्या वेळानं डोळे उघडून त्या आपल्या पतीबद्दल विचारत होत्या. 

सायंकाळी उशीरा त्यांची प्रकृती आणखीनच खालावल्यानं त्यांनी हॉस्पीटलमध्ये भर्ती करण्यात आलं होतं. आता मात्र, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय.