वैष्णोदेवी भाविकांच्या हेलिकॉप्टरला अपघात, सात ठार

जम्मू-काश्मीरमधील कटरा येथे भाविकांना परत घेऊन येणाऱ्या हेलिकॉप्टरला आग लागल्याने अपघात झाला.

Updated: Nov 23, 2015, 02:19 PM IST
वैष्णोदेवी भाविकांच्या हेलिकॉप्टरला अपघात, सात ठार title=

जम्मू : वैष्णवदेवीचे दर्शन घेऊन परतत असलेल्या भाविकांवर सोमवारी काळाने घाला घेतला. वैष्णवदेवीहून कटराकडे परतत असताना हेलिकॉप्टर कोसळल्याने हा दुर्देवी अपघात झाला. 

जम्मू-काश्मीरमधील कटरा येथे भाविकांना परत घेऊन येणाऱ्या हेलिकॉप्टरला आग लागल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या अपघातात पायलटसह हेलिकॉप्टरमधील सहा भाविकांचा मृत्यू झाला. दरम्यान, या हेलिकॉप्टरचा चक्काचूर झाल्याने कोणीही वाचले नसल्याची शक्यता प्रथमदर्शनी दिसत आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.