'चिन्नी गेलीय' हे तिच्या आईला अजूनही माहीत नाही...

अभिनेत्री आणि भाजपच्या खासदार हेमामालिनी यांच्या गाडीसोबत झालेल्या अपघातात एका चिमुरडीला आपला जीव गमवावा लागलाय. पण, या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तिच्या आईला मात्र अजूनही या गोष्ट माहीत झालेली नाही.

Updated: Jul 3, 2015, 05:41 PM IST
'चिन्नी गेलीय' हे तिच्या आईला अजूनही माहीत नाही... title=

जयपूर : अभिनेत्री आणि भाजपच्या खासदार हेमामालिनी यांच्या गाडीसोबत झालेल्या अपघातात एका चिमुरडीला आपला जीव गमवावा लागलाय. पण, या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तिच्या आईला मात्र अजूनही या गोष्ट माहीत झालेली नाही.

ऑल्टो गाडीत चिमुरडी चिन्नी आपल्या कुटुंबीयांसोबत जयपूरहून परतत होती... आणि तेव्हाच समोरून येणाऱ्या हेमामालिनी यांच्या मर्सिडीज गाडीसोबत त्यांच्या गाडीचा अपघात झाला.

अपघातात चिमुकली चिन्नी गाडीबाहेर फेकली गेली त्यामुळे तिला गंभीर दुखापत झाली होती. हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू असताना तिला वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आलं. अपघातानंतर जवळपास अर्धा तास कोणतीच मदत न मिळाल्यामुळे चिन्नीला हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यास उशीर झाला, असं तिचे वडील हनुमान यांनी म्हटलंय. 

चिन्नीची आई शिखा खंडेलवाल हिच्यावर जयपूरच्या एसएमएस हॉस्पीटलच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत... अपघातानंतर गंभीर जखमी झालेली शिखा बेशुद्ध पडली होती. आता ती शुद्धीवर आली असली तरी तिला कुटुंबीयांनी अजून चिन्नीच्या मृत्यूची बातमी दिलेली नाही. दोन्हीही मुलं सुरक्षित असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचं शिखाला सांगण्यात आलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.