मोदी धमकीने राहुल गांधींना धडकी, प्रचार दौरा रद्द

राहुल गांधी आज उत्तरप्रदेशातील सरारानपूरच्या दौ-यावर जाणार होते मात्र मसूदवर झालेल्या कारवाईमुळे राहुल गांधीना सहारानपूरचा दौरा रद्द करावा लागलाय. मसूद हा काँग्रेसचा सहारानपूराचा उमेदवार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 29, 2014, 12:01 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, सहारनपूर, उत्तरप्रदेश
काँग्रेस नेते राहुल गांधी आज उत्तरप्रदेशातील सरारानपूरच्या दौ-यावर जाणार होते मात्र मसूदवर झालेल्या कारवाईमुळे राहुल गांधीना सहारानपूरचा दौरा रद्द करावा लागलाय. मसूद हा काँग्रेसचा सहारानपूराचा उमेदवार आहे.
मोदींबाबतच्या अक्षेपहार्य वक्तव्यामुळे त्याला रात्री अटक करण्यात आलीये. आणि यामुळेच राहुल गांधींना आजचा सहारानपूरचा दौरा रद्द करावा लागल्याचं बोललं जातंय.
दरम्यान, उत्तर प्रदेशातल्या सहारनपूरचे काँग्रेस उमेदवार इम्रान मसूदला शनिवारी रात्री उशीरा अटक करण्यात आलीय. नरेंद्र मोदींचे तुकडे-तुकडे करण्याची धमकी त्यांनी दिली होती. एका प्रचारसभेत बोलताना मसूदचा तोल ढळला होता. मोदींनी उत्तरप्रदेशचं गुजरात करण्याचा प्रयत्न केला, तर मी त्यांचे तुकडे करीन. मी मरायला घाबरत नाही आणि मारायलाही घाबरत नाही. गुजरातमध्ये फक्त ४ टक्के मुस्लिम आहेत. उत्तरप्रदेशात २४ टक्के मुस्लिम आहेत, अशा शब्दांत त्यांनी मोदींना जाहीर धमकी दिली. नंतर आपल्या या विधानाबाबत त्यांनी माफीही मागितली.
प्रचाराच्या भरात आपण असं बोलून गेलो. आपल्याला अधिक सावध राहायला हवं, असं मसूद म्हणाला होते. आता मसूद यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, त्यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी भाजपनं केलीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.